Events

    छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ( शुक्रवार ११ मार्च २०१६ )

गडवाट... प्रवास सह्याद्रीचा तर्फे, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानदिना निमित "रक्तदान हेच जीवनदान" हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे... 

शक्तिस्थळ तुळापूर येथे, छत्रपती संभाजी महाराजांचे रक्त स्वराज्यासाठी, रयतेसाठी सांडले... तर त्यांना आदरांजली देण्यासाठी रक्तदान करणे हीच आपली खऱ्या अर्थाने श्रद्धांजली होईल... 

स्वत:च्या तेजाने प्रकाशमान होत भारतीयांना स्वातंत्र्याची दिशा दाखवणाऱ्या व आपल्या रक्तात स्वाभिमानाचा अंगार फुलवणाऱ्या ह्या स्वराज्याच्या धाकल्या धन्याला, छत्रपती संभाजी राजांना श्रद्धांजली वाहायला गडवाट परिवार ११ मार्च २०१६ रोजी पुढील ठिकाणी एकत्र येत आहे.

स्थळ: शक्तिस्थळ तुळापुर, छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ 

दिनांक : शुक्रवार, ११ मार्च २०१६ 
रक्तदान शिबीर: सकाळी ९ वाजता सुरु होईल. 

शक्तिस्थळ तुळापुर आणि शक्तिस्थळ वढू ह्या दोन्ही समाधीस्थळांना भेट घेतली जाईल. एकत्रित येऊन स्वराज्याच्या धाकल्या धन्यांना, छत्रपती संभाजीराजांना श्रद्धांजली वाहून, पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले जाईल. 

!! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!