Events

    घनगड - कोरीगड दुर्गभ्रमंती (रविवार ११ ऑक्टोबर २०१५ )

गडवाट... प्रवास सह्याद्रीचा आयोजित सह्याद्री स्वच्छता मोहिमेचा पुढचा टप्पा... 

घनगड - कोरीगड दुर्गभ्रमंती तसेच स्वच्छता,,,, 

दिनांक : रविवार ११ ऑक्टोबर २०१५ 
वेळ : सकाळी ८:३० वाजता 
भेटण्याचे ठिकाण : कोरीगड पायथा

( येताना स्वत:चा दुपारचा जेवणाचा डब्बा सोबत आणणे. ) 

=============================================
सोबत काय आणाल ?

१) जेवणाचा डब्बा 
२) पाण्याची बाटली (२ ते ३ लिटर)
३) सुका खाऊ 
४) ट्रेकिंग शूज किंवा चांगली ग्रीप असेल असे शूज 
५) कोणते औषध चालू असल्यास ती सोबत असावीत.
६) ओळखपत्र

टीप :- वेळेत तास ते अर्धा तास मागेपुढे बदल होवू शकतो.
-----------------------------------------------------------

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी खालील सभासदाशी संपर्क साधावा.

सुहास पवार :- ०९००४०३६५७३
आबासाहेब कापसे - ९८७०१४०११४

टीप :- नोंदणी फक्त फोनवरूनच निश्चित केली जाईल. (किंवा SMS करावा )
------------------------------------------------------------------------------------

घनगड - कोरीगड 

गडांचा इतिहास : 
मुळशी धरणाच्या पश्चिमेला असलेल्या मावळाला ‘कोरसबारस’ मावळ म्हणतात. याच मावळात येणारा हा घनगड हा आड बाजूला असलेला छोटेखानी किल्ला आहे. तसेच लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणार्‍या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर "कोरीगड" आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे, त्याच्या सद्यस्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे. या किल्ल्याला कोरीगड, कोराईगड या नावाने ही ओळखतात. तर या गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावामुळे या किल्ल्याला शहागड या नावानेही ओळखतात.लोणावळ्याच्या परीसरात असल्यामुळे मुंबई - पुण्याहून एका दिवसात हा किल्ला पाहून परत येता येते. प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठे पर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली असे. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावरील लोणावळा - खंडाळा परीसरात येण्यासाठी प्राचिन काळापासून दोन घाटमार्ग आहेत.

१) पाली - सरसगड - ठाणाळे लेणी - वाघजाई घाट - तैलबैला - कोरीगड. 
२) पाली - सरसगड - सुधागड - सवाष्णीचा घाट - घनगड - तैलबैला - कोरीगड. 

घनगड व कोरीगड किल्ल्याबद्दल इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. याचा उपयोग टेहळणीसाठी व कैदी ठेवण्यासाठी केला जात असावा.