Events

    अनाथ मुलांच्या सांगाती, गडवाटची यंदाची शिवजयंती !!

अनाथ मुलांच्या सांगाती, गडवाटची यंदाची शिवजयंती !! 

तमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्य, राष्ट्रमाता जिजाऊ मांसाहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज!! 

होय, आपल्या महाराजांचा, छत्रपती शिवरायांचा जन्मसोहळा जवळ येतोय....युगपुरुषाचा जन्मोत्सव येतोय.....(तमाम मराठ्यांचा हा सण) गुरुवार, १९ फेब्रुवारी २०१५.... 

"गडवाट.... प्रवास सह्याद्रीचा" हि आपली संस्था, नेहमीच शिवजयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करत असते.. त्याचप्रकारे आपली यंदाची शिवजयंती "आधारतीर्थ" ह्या नाशिकस्थित शेतीसाठी बलिदान देणाऱ्यां शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या आधाराश्रमातील मुलांसोबत साजरी करणार आहोत. त्यांना महाराजांच्याबद्दल माहिती, विचार सांगत,,, संपूर्ण दिवस त्यांच्या सोबतीत घालवून साजरी केली जाणार आहे... 

तरी आपणा सर्वांना गडवाटतर्फे अगत्याचे आमंत्रण देण्यात येत आहे.. !!

शिवजन्मोत्सव २०१५ : कार्यक्रम स्वरूप 
==========================
कार्यक्रम स्थळ- आधारतीर्थ आधाराश्रम, अंजनेरी , त्र्यंबकेश्वर. ( नाशिक)

सकाळी ८ वाजता : त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन. 
शोभायात्रा आणि शिवरायांची पालखी मिरवणूक (आधारतीर्थ आश्रमापर्यंत) 

प्रमुख उपस्थिती : श्री. प्रमोद गायकवाड (संचालक - Silicon valley India ) 
मार्गदर्शनपर व्याख्यान : श्री योगेश नांगरे - दुर्गअभ्यासक 
मुख्य आकर्षण : ''जेव्हा गड बोलू लागला" (एकपात्री प्रयोग) सादरकर्ते - संकेत नेवकर
पोवाडा: "शिवजन्म ते शिवशाही" सादरकर्ते - कृष्णा मुरकुटे (गडवाटकरी नाशिक)
आश्रमवासी मुलांच्या कला: गीत, पोवाडे, चित्रकला 

अश्याप्रकारे शिवजयंतीचा संपूर्ण दिवस, आश्रमवासी मुलांच्या सहवासात व्यतीत करण्यासाठी आपणास आग्रहाचे निमंत्रण !! 

जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे !! 
============================================

सदर शिवजयंती उत्सव सोहळ्यात सहभागी होण्याकरिता गडवाटच्या खालील सभासदांशी संपर्क साधावा.

मुंबई - आबासाहेब कापसे ९८७०१४०११४ , 
संदीप वाडकर ८०९७७२८१८१

पुणे - राहुल बुलबुले ७७४१०३४६१४ 

सातारा - अजयदादा जाधवराव ९४२२४००६५०, 

संभाजीनगर (औरंगाबाद ) - प्रतिक पाटील ९५०३६१६८८८ , अविनाश लोखंडे : ९१५८१९१५११

कोल्हापूर - अमर मोरे ८९७५७२०२०४,

नाशिक - डॉ. भोजराज गायकवाड : ०९४२२२६२३२२ ,
डॉ. उत्तम फरताळे : ०९८९०५८४७३४

अहमदनगर: प्रशांत मुनफन : ९८६०९०९१७६

जळगाव : अमोल देशमुख : ९९७०३९८६१६

सोलापुर : सुदर्शन शिंदे : ९९७०७२९४७२