Events

    राजमाता जिजाऊ जयंती उत्सव (सोमवार, १२ जानेवारी २०१५)

 

जयंती हिंदुस्तानच्या आद्य स्वातंत्र्य संग्रामिणीची !! 

महाराष्ट्राच्या मातीत, या मातीतल्या माणसांच्या मनात, आचरणात ज्यांनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात त्याच स्वाभिमानाच आणि स्वातंत्र्याच बीज रोवणाऱ्या त्या महान माऊलीचे नाव म्हणजे "जिजाऊसाहेब". 

त्यांना फक्त शिवरायांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊसाहेबांना अगदी शोभते... 

अश्या आपल्या सर्वांच्या "आऊ"साहेबांचा जयंती सोहळा..... 
सोमवार दिनांक १२ जानेवारी २०१५ रोजी येत आहे.... 
"गडवाट.... प्रवास सह्याद्रीचा" तर्फे राजमाता जिजाऊ जयंती उत्सव सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा संपूर्ण हर्षोल्हासात साजरा करण्यात येणार आहे.. तरी सर्व गडवाटकर्यांना अगत्याचे निमंत्रण !! 

पुढील ठिकाणी राजमाता जिजाऊ जयंती सोहळा साजरा करण्यात येईल. (** सर्व विभागांची माहिती लवकरात लवकर अपडेट करण्यात येईल.) 

मुंबई : 
वीर राजमाता जिजाऊ उद्यान 
भायखळा, मुंबई 
दिनांक : १२ जानेवारी २०१५ 
वेळ: सकाळी ८ ते १० वाजता 

जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!