Events

    "गडवाट...प्रवास सह्याद्रीचा" आयोजित सह्याद्री स्वच्छता मोहीम (२३ व ३० नोव्हेंबर २०१४)

"गडवाट...प्रवास सह्याद्रीचा" आयोजित सह्याद्री स्वच्छता मोहीम (२३ व ३० नोव्हेंबर २०१४)

येत्या २३ व ३० नोव्हेंबर रोजी आपण महाराष्ट्रातल्या काही किल्ल्यांवर "सह्याद्री स्वच्छता मोहीम" राबविणार आहोत… आपल्यासारखे बरेचसे ग्रुप किंवा सामाजिक संस्था हा उपक्रम राबविते… या शिवकार्यात आपलाही थोडा हातभार लागावा हा गडवाट परिवाराचा प्रयत्न आहे. ज्या किल्ल्यांवर आपण सफाईचा उपक्रम राबविणार आहोत तेथे बहुतांशी पर्यटकांचा कायमचा राबता असतो. त्यामुळे किल्ल्यावर लक्षणीय प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या इ. कचरा पहावयास मिळतो… आणि असा कचरा जास्तीत जास्त पाण्याच्या टाक्यात पडलेला आढळतो… आपण वर्षभर या ना त्या किल्ल्यांवर भटकतच असतो परंतु या उपक्रमांतर्गत गडवाट परिवार आपले गडकिल्ले आणि सह्याद्री यांचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करणार आहे….

साधारणत: उपक्रम कसा असेल ? 
१) प्रत्येक किल्ल्यावर ५-१० जणांचा ग्रुप असेल. 
२) साफसफाई करते वेळेस कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येकाला पिशवी आणि Handgloves दिले जातील… 
३) किल्ला चढाईस सुरुवात करतावेळेस सफाईस सुरुवात केली जाईल… 
४) स्वच्छता मोहीम २ तासांची असेल. 
५) गडावर भगवा ध्वज (असेल तर लावायचा नाही) फडकवून मोहिमेची सांगता. 

*** प्रवास व मोहिमेस लागणारा संपूर्ण कालावधी १ दिवसाचा आहे.
*** जेवणाचा डबा व प्रवास खर्च स्वत:चा असेल 

=======================================

पुढील ठिकाणी आपण "सह्याद्री स्वच्छता मोहीम" राबवणार आहोत. तरी ज्या इच्छुक सदस्यांना मोहिमेत भाग घ्यायचा असेल त्यांनी सोबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा. 

१) मुंबई विभाग = २३ नोव्हेंबर (असावा किल्ला , अशेरीगड)
३० नोव्हेंबर (तांदुळवाडी किल्ला, कामनदुर्ग) 
संपर्क : आबासाहेब कापसे :- ९८७०१४०११४
सुहास पवार - ०९००४०३६५७३ 

२) पुणे विभाग = तारीख लवकरच कळविण्यात येइल. (राजगड, मल्हारगड)
संपर्क: राहुल बुलबुले - ०९७६२४५८४७३ 

३) सातारा विभाग = तारीख लवकरच कळविण्यात येइल.
संपर्क: अजय जाधवराव - ०९४२२४००६५० 

४) नाशिक विभाग = तारीख लवकरच कळविण्यात येइल.
संपर्क: अमित कानडे - ०९३७३४९४७७७