Events

     किल्ले रतनगड दुर्गभ्रमंती (१२ ऑक्टोंबर २०१४)

 

 

‘रतनगड’, रतनवाडी, ता. अकोले जि. अहमदनगर 
हा किल्ला गिर्यारोहक, निसर्गप्रेमी आणि साहसी चढाई करण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक पर्वणीच आहे. ४३०० फुट उंच असलेला हा गड समुद्रसपाटीपासून ३५२३ फुट उंचीवर आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्याशी असलेल्या रतनवाडीहून जाता येते. 

हा किल्ला कोळी सरदार जावजी यांनी १७६३ साली ताब्यात घेतल्याची सरकार दप्तरी नोंद असून हा किल्ला म्हणजे एक महत्वाचे ठाणे मानले जाई. १८२० साली कॅप्टन गॉर्डनने किल्ला ताब्यात घेतल्या नंतर १८२४ साली आदिवासी सेनानी रामोजी भांगरेंनी पुन्हा ताब्यात घेतला.

हा गड अतिशय प्रेक्षणीय असून पूर्ण गड चढण्यासाठी अनेक ठिकाणी साहस आणि धैर्य अंगी असणे महत्वाचे आहे.

किल्ल्यावर गणेश दरवाजा, रत्नादेवीची गुहा, मुक्कामाची गुहा, देवीदेवतांची शिल्पे कोरलेला प्रमुख दरवाजा, गडावरील जुन्या इमारतींचे अवशेष ज्याला इमारतींचे जोतेही म्हणतात, कडेलोट स्थळ, राणीचा हुडा म्हणून ओळखला जाणारा भग्न बुरुज, प्रवरा नदीचे उगमस्थान, मोर्च्याची ठिकाणे आणि बुरुज, अंधारकोठी आणि त्यातील पिण्यास योग्य असलेले मधुर पाण्याचे तळे, खडकाला आरपार भगदाड असलेले गडावरील अत्युच्च ठिकाण जे नेढा म्हणून ओळखले जाते आणि कल्याण दरवाजा हि प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.

=============================================
दुर्गभ्रमंती : किल्ले रतनगड 
दिवस : रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४
वेळ : सकाळी ५ वाजता (किल्ल्याच्या पायथ्याच्या गावी)

भ्रमंती शुल्क रु. ६००/- ( यामध्ये इगतपुरी ते रतनगड ते इगतपुरी असे प्रवासशुल्क आणि सकाळचा चहा, नाश्ता व दुपारचे जेवण यांचा समावेश असेल.) 

टीप: मुंबई बाहेरील इतर विभागातून येणाऱ्या सदस्यांनी दिनांक १२ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजेपर्यंत इगतपुरी स्थानकात भेटावे. 

=============================================

सोबत काय आणाल ?

१) पाण्याची बाटली (२ ते ३ लिटर)
२) सुका खाऊ 
३) ट्रेकिंग शूज किंवा चांगली ग्रीप असेल असे शूज
४) कोणते औषध चालू असल्यास ती सोबत असावीत.
५) ओळखपत्र

=============================================

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी खालील सभासदाशी संपर्क साधावा.

रुपेश पवार : ०९६१९९४२३१०
बापू पवार : ०८६८९८४६०३०

टीप :- नोंदणी फक्त फोनवरूनच निश्चित केली जाईल. (किंवा SMS करावा)