Events

    "गडवाट... प्रवास सह्याद्रीचा" - चौथा वर्धापनदिन सोहळा - २० जुलै २०१४

जय जिजाऊ जय शिवराय, 

छत्रपती शिवरायांच्या विचारांची कास धरून, महाराजांचे उद्दात्त विचार जनमाणसापर्यंत पोहोचावेत ह्या उद्देशाने सुरु झालेला हा प्रवास, लहान - मोठे ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम करत आज ३ वर्षांच्या पूर्ततेवर येवून पोहोचला आहे... 

आपल्या संस्थेतर्फे अनेक ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम घेताना आपण नेहमीच समाजाच्या उपेक्षित घटकाला समोर ठेवतो.... तसेच अनाथ, अपंग, मतीमंद, उपेक्षित मुलांसोबत आपण नेहमी असे उपक्रम करत असतो... छत्रपती शिवरायांचे असंख्य क्षेत्रातले ज्ञानकौशल्य, दूरदृष्टी, आणि अतुल्य पराक्रम ह्या गुणांची माहिती व्हावी हा त्यामागचा माफक हेतू असतो.... 

तसेच विविध गडकिल्ल्यावर मोहिमा घेऊन गडकिल्ल्यांची माहिती नवीन मुलांना करून देत असतो... त्यामागे नवीन तरुण पिढीला आपल्या गडकिल्ल्या विषयी उत्स्कुता आणि आवड निर्माण व्हावी हा हेतू असतो... 

येत्या १७ जुलै २०१४ ला आपल्या गडवाट ह्या संस्थेला तब्बल ३ वर्षे पूर्ण होत आहेत.... त्यानिमित्त आपण अजून एक छोटासा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम हाती घेत आहोत.... 

आपण आपला वर्धापनदिन सोहळा रविवार दिनांक २० जुलै २०१४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुलवडेमळा (उदापूर) तालुका - जुन्नर येथील शालेय विध्यार्थ्यांसोबत भ्रमंती सफर करून साजरा करणार आहोत. 
तसेच या शाळकरी मुलांना, शालेय साहित्य वाटप सुद्धा करणार आहोत... त्यांच्या शालेय प्रवासासाठी, प्रगतीसाठी गडवाटचा हा छोटासा हातभार.... 

आपण सुद्धा गडवाटच्या ह्या वर्धापनदिन सोहळ्यात जरूर सहभागी व्हावेत.... आपणा सर्वांसाठी गडवाटचे आग्रहाचे निमंत्रण.... 

दिनांक : रविवार २० जुलै २०१४ 
वेळ: सकाळी ८ वाजता 
स्थळ : शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरी 


गडवाटच्या वर्धापनदिन सोहळ्यात सहभागी होण्याकरिता प्रत्येक विभागासाठी गडवाटच्या खालील सभासदांशी संपर्क साधावा.

मुंबई = आबासाहेब कापसे - ९८७०१४०११४ / संदीप वाडकर - ८०९७७२८१८१
पुणे = स्वप्निल कोलते-पाटिल - ९७६६६०१३३७ / राहुल बुलबुले - ९७६२४५८४७३ 
सातारा = अजयदादा जाधवराव - ९४२२४००६५० 
संभाजीनगर (औरंगाबाद ) = प्रतिक पाटील ९५०३६१६८८८ 
कोल्हापूर = अमर मोरे ८९७५७२०२०४ 
नाशिक = अमित कानडे - ९३७३४९४७७७
सोलापुर = रवी मोरे - ८०८१८७४०४७ / शशि घुमरे - ९८२३४१६११७
अहमदनगर = प्रशांत मुनफन - ९८६०९०९१७६ / संदीप शिंदे - ७५८८०९२५३४

अवघे अवघे या...!!!