Events

    उपेक्षित मुलांच्या सांगाती, गडवाटची यंदाची शिवजयंती !! (१९ फेब्रुवारी २०१४)

उपेक्षित मुलांच्या सांगाती, गडवाटची यंदाची शिवजयंती !!तमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्य, राष्ट्रमाता जिजाऊ मांसाहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज!! 

होय, आपल्या महाराजांचा, छत्रपती शिवरायांचा जन्मसोहळा जवळ येतोय....युगपुरुषाचा जन्मोत्सव येतोय.....(तमाम मराठ्यांचा हा सण) बुधवार, १९ फेब्रुवारी २०१४.... 

"गडवाट.... प्रवास सह्याद्रीचा" हि आपली संस्था, नेहमीच शिवजयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करत असते.. त्याचप्रकारे आपली यंदाची शिवजयंती हि समाजाने उपेक्षिलेल्या मुलांच्या संगतीत.... त्यांना महाराजांच्याबद्दल माहिती, विचार सांगत,,, संपूर्ण दिवस त्यांच्या सोबतीत घालवून साजरी केली जाणार आहे... 

गडवाटची यंदाची शिवजयंती, सातारा बाल निरीक्षण गृह, सातारा येथे साजरी केली जाणार आहे. 
तरी आपणा सर्वांना गडवाटतर्फे अगत्याचे आमंत्रण देण्यात येत आहे.. !! 

 

:: प्रमुख उपस्थिती:


माननीय खासदार, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. 
 

:: प्रमुख वक्ते: 


इतिहास आणि दुर्गअभ्यासक दुर्गमहर्षी श्री प्रमोद मांडे सर. 
 

:: मुख्य आकर्षण :


महाराष्ट्रभर विख्यात, बालशाहीर हेरंब पायगुडे याचा "शौर्यगाथा वीरांची" हा पोवाड्यांचा कार्यक्रम, 
"हिंदतेज" या गटाची, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके


 

शिवजयंतीच्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल... १) सकाळी ८ वाजता, सातारा पोवई नाका येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन आणि अभिवादन करून, ढोल पथकाच्या साथीने पोवईनाका ते बाल निरीक्षण गृह छत्रपती शिवरायांची पालखी आणि मिरवणूक 

२) निरीक्षण गृहात मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, आणि अल्पोपहार 

३) छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन, आणि कार्यक्रमाला सुरुवात 

४) छत्रपती उदयनराजे यांचे मार्गदर्शनपर भाषण

५) दुर्गमहर्षी श्री प्रमोद मांडे सर यांचे इतिहास आणि गडकिल्ले यावरील विवेचनात्मक मार्गदर्शन 

६) बालशाहीर हेरंब पायगुडे, याच्या खड्या आवाजातून शूरवीरांची गाथा, पोवाडे 

७) बाल निरीक्षण गृहातील मुलांसोबत, गडवाट आयोजित मिष्ठान्न भोजन 

८) राष्ट्रगीत व कार्यक्रमाची सांगता. 

शिवजयंती उत्सवाचा कार्यक्रम सकाळी ७ वाजता पोवई नाका, सातारा येथे पोहोचण्यापासून ते बाल निरीक्षण गृहात सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत होईल.

सदर शिवजयंती उत्सव सोहळ्यात सहभागी होण्याकरिता गडवाटच्या खालील सभासदांशी संपर्क साधावा.

मुंबई - आबासाहेब कापसे ९८७०१४०११४ , संदीप वाडकर ८०९७७२८१८१
पुणे - राहुल बुलबुले ९७६२४५८४७३ , रोहित वाघेरे ९८८१२१०२९९ 
सातारा - अजयदादा जाधवराव ९४२२४००६५०, झुंजारराव कदम ९९२२७६१०१० 
संभाजीनगर (औरंगाबाद ) - प्रतिक पाटील ९५०३६१६८८८ 
कोल्हापूर - अमर मोरे ८९७५७२०२०४, सरदार पाटील ८०५५५२५४५४
नाशिक - अमित कानडे - ९३७३४९४७७७