Events

    राजमाता जिजाऊ जयंती !! (१२ जानेवारी २०१४)


जयंती हिंदुस्तानच्या आद्य स्वातंत्र्य संग्रामिणीची !!


महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यांनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे "जिजाऊसाहेब".


त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते.


त्याच "आऊ"साहेबांचा जयंती सोहळा..... रविवार दिनांक १२ जानेवारी २०१४ रोजी येत आहे....
"गडवाट.... प्रवास सह्याद्रीचा" तर्फे राजमाता जिजाऊ जयंती उत्सव गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा संपूर्ण हर्षोल्हासात साजरा करण्यात येणार आहे.. तरी सर्व गडवाटकर्यांना अगत्याचे निमंत्रण !!


पुढील ठिकाणी राजमाता जिजाऊ जयंती सोहळा साजरा करण्यात येईल.


मुंबई :
वीर राजमाता जिजाऊ उद्यान
भायखळा, मुंबई
दिनांक : १२ जानेवारी २०१४
वेळ: सकाळी १० ते १ वाजता


पुणे:
राजमाता जिजाऊ स्मारक
पालखुर्द (भोसले वाडी),
किल्ले राजगड पायथा, पुणे
दिनांक : १२ जानेवारी २०१४
वेळ: सकाळी १० ते १ वाजता


जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!