Events

    शिवस्मारक देखरेख आणि भोवतीचा परिसर स्वच्छता

सप्रेम जय शिवराय मित्रांनो,

 

तारीख आणि वार : रविवार, १५ डिसेंबर २०१३
वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी १२:००
स्थळ: जुहु चौपाटी, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र.

 

गडवाट परिवाराने सुरु केलेल्या जुहू येथील "शिवस्मारक देखरेख व परिसर स्वच्छता" हे गडवाट परिवाराने हाती घेतलेले कार्य आजवर व्यवस्थित रीत्या सुरु आहे. आपण ठरवल्याप्रमाणे दर २ महिन्यातून एकदा संपूर्ण गडवाट परिवाराने एकदा तिथे जाऊन साफ सफाई करायची असते.

 

गेले दीड वर्ष आपल्या गडवाट परिवाराने शिवस्मारक साफ-सफाईची हा दंडक कायम ठेवला आहे.

 

येत्या रविवारी म्हणजे दिनांक १५ डिसेंबर २०१३ रोजी पुन्हा एकदा संपूर्ण गडवाट परिवार जुहु येथील शिवस्मारक येथे साफ सफाई करिता जाणार आहे.

 

सकाळी ९ वाजता साफसफाईच्या कार्यास सुरुवात केली जाईल, याची सर्व गडवाटकर्यांनी नोंद घ्यावी.

 

जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!