Events

    कळसुबाई ट्रेक

आयुष्य म्हणजे पहाटेची वेळ , कळसूबाईचा पायथा आणि चहाचा मंद सुवास…. 

आता पावसाळा सरलाय…वातावरणात कमालीचा बदल झालाय….हिरवा निसर्ग बहरून आलाय… हिरव्यागार वनराईचा शालू पांघरलेल्या सह्याद्रीने आता रानतेरडा, रान गांजा, श्वेतांबरा, फांगळा, आभाळी - नभाळी, धालगोधडी, सोनटिकली, लाजाळू, जांभळी, मंजिरी, गोपाळी, रानतूर, सोनसरी, पांढरी कोरांटी, उंदरी कुसुंबी... अशा आणखी कितीतरी रानफुलांचा साज चढवला आहे… या सह्याद्रीच्या खांद्यावरचे गडशिखरे साद घालतायत…. 
अशातच एक सुंदर भटकंती व्हावी प्रत्येक ट्रेकर्सची इच्छा असते… या अनोख्या सह्याद्रीची नयनरम्य सफर घडवून आणण्यासाठी गडवाट परिवार २८ व २९ सप्टेंबर रोजी "कळसुबाई ट्रेक" आयोजित करत आहे…. 
--------------------------------------------------------------------------------

कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जिल्हातील अकोले तालुक्यात असणाऱ्या सह्याद्री पर्वत रांगेत आहे. याचि उंची सुमारे १६४६ मीटर आहे. अत्यंत रम्य असणाऱ्या या परिसरात अनेक तालेवार, बुलंद तसेच बेलाग किल्ल्याची आणि रमणीय स्थळांची साथ आहे.
शिखरापर्यंत पोहचण्यासाठी ट्रेकिंग मार्ग आहेत. शिखरावर जाण्याचा मुख्य रस्ता भंडारदऱ्यापासून ६ कि. मी. असणाऱ्या बारी या गावापासून सुरु होतो. नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी -भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी गावातून थोडे अंतर गेल्यावर श्री हनुमानाचे मंदिर येते. या हनुमान मंदिरापाठीमागून जाणाऱ्या मार्गाने यात्री शिखरापर्यंत जाण्याचा मार्ग सुरु होतो. तेथे या रस्त्यावर तीन लोखंडी शिड्या आहेत. चढाईतील काही भाग वगळता बाकीचा रस्ता चढण्यास सोपा आहे. तसेच दक्षिणेकडून येणारी गुरांची वाट, त्याच बाजूची गोतीची वाट, तसेच उत्तरेकडील इंदोर गावातून शिखरावर येण्यासाठी वाटा आहेत. शिखरावर तीन लोक एकावेळी बसु शकतील ऐवढे छोटे कळसुबाई देवीचे मंदिर आहे. शिखरावरुन भंडारदरा धरणातील पाण्याने व्यापलेला विस्तीर्ण भाग पर्यटकांचे लक्ष वेधुन घेतो. शिखराच्या उत्तरेला रामसेज, हरिहरगड, ब्रम्हगिरी, अंजनगिरी, घरगड, बहुला, त्रिंगलवाडी, कवनाई हे गड आहेत, पुर्वेला औंढा, विश्रामगड, बितनगड पश्चिमेला अलंग, मदनगड, रतनगड आणि दक्षिणेला पाबरगड, घनचक्कर, हरिशचंद्रगड दिसतात. 

--------------------------------------------------------------------------------

संपूर्ण प्रवास :-

मुंबईहून >>
१) २८ सप्टेबर रोजी रात्री ११ वाजता दादर (मुंबई) येथून खाजगी वाहनाने रवाना… 
२) २९ सप्टेबर रोजी पहाटे ५ ते ६ वाजेपर्यंत पायथ्याच्या गावात 
३) ६ ते ७ सकाळचा नाश्ता 
४) ७ वाजता ट्रेकला सुरुवात 
५) १० वाजता कळसुबाई शिखरावर व आजूबाजूचा परिसर पाहणे… 
६) ११ वाजता उतरायला सुरुवात 
७) २ वाजता पायथ्याच्या बारी गावात जेवण 
८) ४ वाजता मुंबईकडे रवाना
९) ८ ते ९ वाजता मुंबईत दाखल. 

पुणेहून >>>
१) २८ सप्टेबर रोजी रात्री ११ वाजता स्वारगेट (पुणे) येथून खाजगी वाहनाने रवाना… 
२) २९ सप्टेबर रोजी पहाटे ५ ते ६ वाजेपर्यंत पायथ्याच्या गावात 
३) ६ ते ७ सकाळचा नाश्ता 
४) ७ वाजता ट्रेकला सुरुवात 
५) १० वाजता कळसुबाई शिखरावर व आजूबाजूचा परिसर पाहणे… 
६) ११ वाजता उतरायला सुरुवात 
७) २ वाजता पायथ्याच्या बारी गावात जेवण 
८) ४ वाजता पुण्याकडे रवाना


टीप :- वेळेत तास ते अर्धा तास मागेपुढे बदल होवू शकतो. 
--------------------------------------------------------------------------------

सोबत काय आणाल :- 

१) पाऊस असल्याने रेनकोट अत्यावश्यक 
२) पाण्याची बाटली (२ ते ३ लिटर)
३) ओडोमोस, सुका खाऊ 
४) ट्रेकिंग शूज किंवा चांगली ग्रीप असेल असे शूज 
५) औषध चालू असल्यास ती सोबत असावीत. 
६) ओळखपत्र 
--------------------------------------------------------------------------------
ट्रेक फी :-

या ट्रेकची फी ७००/- रु आहे. यात सकाळचा नाश्ता ,जेवण आणि मुंबई ते मुंबई व पुणे ते पुणे प्रवास खर्च समाविष्ट आहे.

टीप :- इतर ठिकाणाहून येणाऱ्यांनी थेट सभासदांशी संपर्क साधावा. 

--------------------------------------------------------------------------------

ट्रेकमध्ये सहभागी होण्यासाठी खालील सभासदांशी संपर्क साधावा :- 

सुहास पवार :- 09004036573
जोतीराम गिड्डे :- 09867206446

टीप :- नोंदणी फक्त फोनवरूनच निश्चित केली जाईल.(किंवा SMS करावा)